जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आता शिवसेनेची मदत न घेता स्वबळाचा नारा देत जिल्ह्याजिल्ह्यात मेळाव्यांचं आयोजन सुरु केलंय. जळगावात आज जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. 


लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगरपालिका, महापालिका तसंच जिल्हा परिषदांच्या निवडणूक स्वबळावर लढल्यानं आगामी काळात युती झाली तर ठीक भाजप येणाऱ्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार अशी घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केलीय. 


 वर्धापन दिनाची जाहीर सभा 


त्याचप्रमाणे  पक्षाचा वर्धापन दिनाची जाहीर सभा मुंबईत घेणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिलीय. येत्या ६ एप्रिल रोजी पक्षस्थापना दिवसाच्या सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसंच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री या सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील अशी महाजन म्हणाले.