लाडकी बहीण योजनेवरून भाजपनं आता काँग्रेसला घेरलं, जाहिरातींमधून नेत्यांना केलं टार्गेट
भाजपनं निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत महिलांना केंद्रस्थानी ठेवून एक जाहीरात केली असून यात त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून भाजपनं आता काँग्रेसला घेरलं आहे.
BJP Advertisement : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता सुरु झाली असून या रणधुमाळीत जनमानसावर नेमका परिणाम साधणाऱ्या जाहीराती राजकीय पक्षांकडून केल्या जात आहेत. भाजपनं निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत महिलांना केंद्रस्थानी ठेवून एक जाहीरात केली असून यात त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून भाजपनं आता काँग्रेसला घेरलं आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवून भाजपनं काँग्रेसविरोधात जाहीरात तयार केली. या जाहिरातीत आणि भाजपकडून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
भाजपने सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री माझी लाडक्या बहीण योजनेवर आधारित एक जाहिरात तयार केली आहे. या जाहिरातीची टॅग लाईन 'काँग्रेला साथ म्हणजे लाडकी बहीण योजनेचा घात' अशी असून या जाहिरातीतून महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नाना पटोलेंना टार्गेट करण्यात आलं आहे. नाना पटोले हे लाडकी बहीण योजनेचे विरोधक असल्याचा आरोप भाजपनं या जाहिरातीतून केल्याचं पाहायला मिळतंय. हा आरोप पूर्णतः सत्य असल्याचा दावा भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केलाय.
हेही वाचा : सदा सरवणकरांचा मोठा निर्णय, राज ठाकरेंची भेट घेऊन कळवणार; म्हणाले 'बाळासाहेबांचा...'
निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्याही जाहिराती सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोणताही नरेटिव्ह सेट करण्यासाठी जाहिराती केल्या जातात. आता भाजपची ही जाहिरात किती परिणामकारक ठरते हे निवडणूकीच्या निकालातून स्पष्ट होईल.