लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी केलेल्या ते विधान उद्धव ठाकरेंना भोवणाची शक्यता आहे. मतदानावेळी दिरंगाई केली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला होता. याप्रकरणात उद्धव ठाकरेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांची शाहनिशा करण्यासाठी निवडणूक आयोगाने अहवाल मागविला आहे. (Election Commission Action Against Uddhav Thackeray Maharashtra Politics news )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीच्या वेळी खरंच संश मतदान झालं का बद्दल मुंबई, ठाणेमधील जिल्हाधिकाऱ्यांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागवण्यात आलाय. जर उद्धव ठाकरेंच्या या आरोपामध्ये काही तथ्य न निघाल्यास उद्घव ठाकरेंवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असं निवडणूक आयोगातील सूत्रांकडून सांगण्यात आलंय. 


लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यांमधील मतदारसंघात 20 मे रोजी मतदान झालं होतं. त्यावेळी मुंबई आणि ठाण्यात संथ मतदानामुळे मतदार केंद्राबाहेर लांबच लांब रांगा असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. तीव्र उन्हाळा आणि सूर्यदेवाचा  कहर अशास्थितीत मतदारांना घराबाहेर पडण कठीण झालं होतं. तीव्र उन्हाळा असूनही मतदारांसाठी निवडणूक आयोगाने कोणतीही व्यवस्था केली नव्हती, असा आरोप मतदारांनी अनेक मतदार केंद्रांवर केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनीही पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. 


निवडणूक आयोगावरील उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंवर कारवाईची मागणीही शेलारांनी केली होती. त्यामुळे आता या आरोपाची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.