Election Result 2019 : राजेंद्र गावित विजयी, बविआचे कडवे आव्हान
पालघरमध्ये बविआचे बळीराम जाधव आणि शिवसेनेचे राजेंद्र गावीत यांच्यात चुरस झाली.
पालघर : लोकसभा निवडणुकीकडेही निकालाकडे सर्वांचंच लक्ष आहे. कारण येथे खूपच चुरस पाहायला मिळाली. सुरुवातीला बविआचे उमेदावर बळीराम जाधव आघाडीला होते. त्यांची आघाडी तोडत शिवसेनेचे राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली. हे चित्र जवळपास पाच ते सात फेऱ्यांपर्यंत दिसून येत होते. एकवेळ असे चित्र दिसून येत होते की, बविआचे बळीराम जाधव यांनी आघाडी घेऊन शिवसेनेला दणका दिला. मात्र, त्यानंतर राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवली. ८८ हजार ८८३ मतांची निर्विवाद आघाडी घेतली आहे. त्यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली आहे.
यंदा पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून राजेंद्र गावित निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ते आधी भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडू रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचे आव्हान होते. बळीराम जाधव यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंही पाठिंबा जाहीर केला असल्यानं इथली लढत चुरशीही झाली.
पालघर मतदारसंघात २०व्या फेरीनंतर राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. त्यांना आतापर्यंत १५०९४४ मतं मिळाली असून, बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना १३६५५२ मते पडली आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार चिंतामण वनगा इथून निवडून आले होते. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांचे निधन झाल्यानंतर या रिक्त झालेल्या जागेवर २०१८मध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेने चिंतामण वनगा यांचे पूत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून राजेंद्र गावित निवडणुकीच्या रिंगणात होते. त्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजेंद्र गावित यांना २ लाख ७२ हजार ७८२ मते मिळाली होती. तर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना २ लाख ४३ हजार ८३८ मते मिळाली होती.
त्यानंतर शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीत आघाडी केल्याने तो मतदारसंघ शिवसेनेने भाजपकडून मागून घेतला आणि तिथून भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेच्या धनुष्यबाणावरून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. परंतु यंदा पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीने बळीराम जाधव यांना काँग्रेस-राष्ट्रवादीनं पाठिंबा दिल्याने त्यांची ताकद वाढली आहे. बळीराम जाधव हे २००९मध्ये पालघरचे खासदार होते.
- शिवसेनेचे राजेंद्र गावीत यांनी पुन्हा आघाडी घेतली आहे. ६८ हजार ३७८ मतांनी आघाडी घेतली असून बळीराम जाधव हे पिछाडीवर गेलेत.
- पालघरमध्ये मोठी चुरस । कोण जिंकणार याची मोठी उत्सुकता
- शिवसेनेच्या राजेंद्र गावितांना एकूण 2 लाख 93 हजार 417 मते तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना 2 लाख 93 हजार 761 मते
- पालघर लोकसभा 15 व्या फेरीत शिसेनेचे राजेंद्र गावित आघाडीवर
राजेंद्र गावित (शिवसेना 99063
बळीराम जाधव (बविआ)90916
नोटा 6448
शिवसेनेचे राजेंद्र गावित 8147मतांनी आघाडीवर
- पालघर राजेंद्र गावित (शिवसेना) 81432, बळीराम जाधव (बविआ) 76442, नोटा 5554
- शिवसेनेचे राजेंद्र गावित 4990 मतांनी आघाडीवर
- नोटा ला 3 नंबरची मते
- पाचव्या फेरीत शिवसेनेचे राजेंद्र गावित 1605 मतांनी आघाडीवर
- पालघर - बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव चौथ्याफेरीनंतर 3490 मतांनी आघाडीवर । शिवसेनाला जोरदार धक्का
पालघर
पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे येथे कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत अनेक दिवस चर्चा रंगली होती. पण शिवसेनेने भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत घेऊन त्यांना उमेदवारी दिली. तर श्रीनिवास वनगा यांना विधीमंडळात पाठवणार असल्य़ाचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे श्रीनिवास वनगा आणि भाजपच्या राजेंद्र गावित यांच्यातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
२०१८ च्या पोटनिवडणुकीचा निकाल
२०१८ च्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांना २ लाख ७२ हजार ७८२ मते मिळाली. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला. यामध्ये श्रीनिवास वनगा यांना २ लाख ४३ हजार २१० मते मिळाली होती. तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना २,२२,८३८ मते तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला ७१ हजार ८८७ मते काँग्रेसच्या दामू शिंगडा यांना ४७७१४ मते मिळाली होती.
राजेंद्र गावित यांना हितेंद्र ठाकूर हे टक्कर देतांना दिसणार आहेत. बहुजन विकास आघाडीला काँग्रेस आणि सीपीआयने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत युती विरुद्ध ही महाआघाडी असा सामना रंगणार आहे.