भिवंडी : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे कपिल पाटील यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम होती. १,४४,७७२ इतक्या मतांची आघाडी घेतली. त्यामुळे ही आघाडी काँग्रेसचे सुरेश टावले यांना शेवटच्या क्षणी मोडणे अशक्य होते. त्यामुळे पाटील यांचा विजय निश्चित होता. १ लाख ५५ हजार ९०४ मतांची आघाडी घेत कपिल पाटील यांनी विजय संपादन केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर शहरी, ग्रामीण, आदिवासी, अल्पसंख्याक, परप्रांतीय अशी लोकसंख्या दिसून येते. त्यामुळे कौल कोणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. परंतु भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली. तर काँग्रेसचे सुरेश टावरे पिछाडीवर राहिलेत. कपिल पाटील यांच्याविरोधात मतदार आणि मित्रपक्ष शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांचे असलेले लक्षणीय प्रमाण यामुळे कपिल पाटील यांना ही निवडणूक जड जाईल असे सांगितले जात होते. मात्र, कपिल पाटील हे विजयी झाले आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये कपिल पाटील यांना ७४ हजार ५६८ मते मिळाली असून, काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्या पारड्यात आतापर्यंत ५६ हजार ३१० मते मिळालीत.   


गेल्या निवडणुकीत भाजपच्या कपिल पाटील यांना ४ लाख ११ हजार ०७० मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांना यांना ३ लाख १ हजार ६२० मते मिळाली होती.


- भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी ४४ हजार ७७८ मतांची आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसचे सुरेश टावरे पिछाडीवर आहे. 


- हाती आलेल्या कलनुसार भिवंडी लोकसभेची जागा भाजप आपल्याकडे राखण्याची शक्यता


कपिल पाटिल -भाजपा - 81770
सुरेश टावरे - कांग्रेस   - 59553
अरुण सावंत - वंचित - 8240


भाजपा आघाडी - 22217


- भाजपचे कपिल पाटील यांची आघाडी कायम । 43913


काँग्रेसचे सुरेश टावरे यांना 29199 मते । भाजप  14714 मतांची घेतली आघाडी 


भिवंडी लोकसभा दुसरी फेरी


कपिल पाटील -भाजपा - 19280
सुरेश टावरे - कांग्रेस   - 11549
अरुण सावंत - वंचित-  1705


भाजपला आघाडी - 7731


 भिवंडी लोकसभा मतदार संघात कपील पाटील यांनी आघाडी घेतली  तर काँग्रेसचे सुरेश टावरे हे पिछाडीवर


 भिवंडी लोकसभा मतदार संघात प्रेसिडेन्सी शाळेच्या इमारतीत टपाली मतदानाच्या मोजणीला सुरुवात


भिवंडी : या मतदारसंघातून काँग्रेसने माजी खासदार सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे. पण पक्षातूनच त्यांना विरोध होत आहे. ४२ नगरसेवकांनी त्यांना विरोध केला. सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्याची मागणी होत होती. दुसरीकडे कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनीही अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू होती. दरम्यान, भाजपने कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराजी दर्शवली आहे. कपिल पाटील यांना यामुळे निवडणुक कठीण जाऊ शकते.


२०१४ चा निकाल


२०१४ मध्ये भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील हे विजयी झाले होते. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे विश्वनाथ पाटील यांचा पराभव झाला होता. मोदी लाटेत कपिल पाटील यांना जवळपास १ लाख १० हजार मतांनी विजय झाला होता.