मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. आधीच कोरोना आणि महागाईने त्रस्त असलेल्या लोकांना आता विजेच्या वापरासाठी अधिक शुल्क भरावे लागू शकते. कारण राज्यातील 16 शहरातील वीज वितरण खासगी कंपन्यांकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राज्यातील 16 शहरांमधील वीज वितरण खासगी कंपन्यांकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येऊ शकतो. 16 शहरांमधील महावितरणाचा कारभार खासगी कंपन्याकडे जाऊ शकतो. 


असे झाल्यास सर्वसामान्यांना वीज दर वाढीचाही सामाना करावा लागू शकतो. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ऊर्जा मंत्रालयाकडून वीज यंत्रणा खासगी कंपनीकडे सुपूर्द होऊ शकते.


कोणत्या शहरांना वीज दरवाढीचा झटका बसू शकतो


  • लातूर

  • सोलापूर 

  • कोल्हापूर

  • औरंगाबाद

  • अकोला 

  • नागपूर

  • ठाणे

  • कल्याण

  • भांडुप

  • नाशिक

  • पुणे