आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर आहे. ताडोबात आजपासून हत्तीवरील सफारी सुरू झाली आहे. 


पट्टेदार वाघासोबतही जवळून बघण्याची संधी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तासाभराची ही सफारी कोअर झोनमधून होणार असल्याने, पर्यटकांना पट्टेदार वाघासोबतच इतरही प्राणी जवळून बघण्याची संधी या निमित्तानं मिळणार आहे.  


बुकिंग न मिळाल्यानं होते निराशा 


ताडोबात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला कोर झोनमध्ये सफारी मिळावी, असं मनोमन वाटतं असतं. पण बऱ्याचदा ऑनलाईन बुकिंग न मिळाल्यानं त्यांची निराशा होते. मग त्यांना बफर झोनची सफारी करावी लागते. 


हत्तीची सफारी सुरू करण्याचा निर्णय


मात्र आता क्षेत्रात प्रवेशासाठी वेगळी संधी मिळणार आहे. ताडोबा व्यवस्थापनानं हत्तीची सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १३ नोव्हेंबरपासून ही सफारी सुरू होत आहे. गेली दोन वर्षे ही सफारी बंद होती. 


एका हत्तीवर ८ पर्यटक बसवले जाणार


सकाळी आणि दुपारी ही सफारी घडवली जाणार असून, एका हत्तीवर आठ पर्यटक बसवले जाणार आहेत. त्यासाठी प्रौढांना एक हजार तर मुलांना ५०० रुपये शुल्क मोजावं लागणार आहे. 


हत्तीसाठी प्रौढांना प्रत्येकी १ हजार


दोन हत्तींद्वारे ही सफारी होणार आहे. म्हणजे सकाळी १६ आणि दुपारी १६ पर्यटक या सफारीचा आनंद घेऊ शकतात.ताडोबाच्या मोहर्ली या मुख्य द्वारापासून ही सफारी सुरू होईल. त्याचं तिकिट तिथंच उपलब्ध होणार आहे. तेलीया धरणाचा पूर्ण परिसर यात फिरवला जाणार आहे.


लहान मुलांना प्रत्येकी ५०० रूपये


विशेष म्हणजे तेलिया धरणाच्या आजूबाजूला वन्यजीव मोठ्या प्रमाणावर आहेत. पाण्याचा हा मोठा स्त्रोत असल्यानं प्राणी सहज बघायला मिळतात. त्यामुळं हत्तीची सफारी पर्यटकांना पर्वणी ठरेल, यात शंका नाही. तेव्हा ताडोबा भेटीसाठी आता नवे आकर्षण उपलब्ध झाले आहे.