नागपूर :  औरंगाबादला निघालेल्या हेलिकॉप्टरनं वादळामुळे समुद्रपूर तालुक्यातील उमरीमध्ये इमर्जन्सी लँडिंग केलं. या हेलिकॉप्टरमध्ये दोन कॅप्टन आणि पायलटसह एक इंजिनियर होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमधून उड्डाण घेतलेलं हेलिकॉप्टर औरंगाबादला जात असताना अचानक हवामानात बदल होऊन वादळीवाऱ्यासह पाऊस सुरु झाला. 


पायलटनं प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर शेतात उतरवलं. हेलिकॉप्टर शेतात उतरलं म्हटल्यावर गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. काय घटना आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हेलिकॉप्टरचं अचानकपणे लँडिंग झाल्यानं गावात काही वेळा करता भीतीचं वातावरण होतं.