नागपूर : तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर, आज सकाळी नवे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे मुंढे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार सोपवला.मात्र, शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे आता महापालिकेचे आयुक्त नाही या भावनेनं अनेक अधिकारी आणि कर्मचारी आज महापालिकेत कार्यालयीन वेळेपेक्षा उशीरा आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच, तुकाराम मुंढेंच्या सात महिन्याच्या कार्यकाळात असलेले सुरक्षा रक्षक ही आज गायब होते. एकूणच,मुंढेंची पाठ वळताच महापालिकेत पुन्हा बेशिस्तपणा दिसू लागला आहे.


तुकाराम मुंढेंनंतर आता राधाकृष्णन बी नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारत आहेत. तुकाराम मुंढेशी टेलिफोनवरुन संवाद साधल्यानंतर ते पदभार स्वीकारतील. नागपुरातील कोरोनाचं संक्रमण नियंत्रणात आणणं हे आपलं पहिलं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं.


लोकाच्या सहकार्यानं कोरोना नियंत्रणात आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.. यासाठी ते सुरुवाताली अधिकाऱ्यांसबोत आढावा बैठका घेणार आहेत.