Jejuri News: प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मल्हारी मार्तंड श्री खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी जेजुरी गडावर (jejuri gad) सुरू असून आज तिसऱ्या दिवशी मुख्य गाभाऱ्यात फळांची आरास करण्यात आली होती. देव दिवाळीनिमित्त महामंत्र पठणात याग देखील करण्यात आला होता. चंपाषष्ठीनिमित्त देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दररोज पाच हजाराहुन अधिक भाविक खंडेरायाचे दर्शन घेऊन महाप्रसादाच लाभ घेत आहेत. करोनाच्या दोन वर्षांनंतर आता देवदर्शनाला (devdarshan) जोमानं सुरूवात झाली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच देवदर्शनाला उत्साह आला आहे. करोनाच्या काळात कुणालाच सण - सभारंभ साजरे करता आले नव्हते त्यातून देवर्शनासाठीही लोकांच्या रांगाही फार कमी लागत होत्या. देवदर्शनासाठी या दोन वर्षात कोणालाच बाहेर पडता येत नव्हते आता मात्र दोन वर्षांनंतर सगळे नियम शिथिल (india lockdown) झाल्यामुळे आता सगळ्यांनाच देवदर्शनासाठी बाहेर पडता येत आहे. राज्यात सगळीकडे दिवाळी, नवरात्र आणि गणपतीचा (indian festivals) उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. (Enthusiasm of devotees on the occasion of Champashashti festival at Jejuri Fort)


जेजूरीला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचे कुलदैवत बहुजन समाजाचे लाडके श्रध्दास्थान असलेल्या पुरंदर तालुक्यातील जेजुरीच्या श्री खंडोबा देवाचा अवतार कार्य असणारा धार्मिक चंपाषष्टी षडारात्र उत्सवाला आजपासून गडावरील बालद्वारीत श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करून प्रारंभ झाला आहे. सहा दिवस चालणारा चंपाषष्टी उत्सव म्हणजेच देवदिवाळीला आज सुरुवात करण्यात आली. विधिवत श्रींच्या उत्सव मूर्ती मुख्य गाभाऱ्यातून बालदवारी येथे आणण्यात आल्या प. पू. आद्य नृसिंह भारती शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांचे हस्ते घटस्थापना करण्यात आली. चंपाषाष्टी षडरात्र उत्सवाचे नियोजन जय मल्हार चंपाषाष्टी अन्नछात्र प्रतिष्ठान, श्री मार्तंड देवसंस्थानव समस्त ग्रामस्थ मानकरी, नित्य वारकरी यांचे वतीने केले जाते.


हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना


भाविकांचा प्रतिसाद 


यावेळी राज्यातूनच नव्हे तर बाहेर राज्यातील लाखो भाविक (Bhavik) या यात्रेत दर्शनासाठी म्हसवड गावात झाले होते. श्री सिद्धनाथ आणि जोगेश्वरी हे देवस्थान नवसाला पावणारे असल्यामुळे बाहेरून नवस फेडायला येणारे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. गुलाल (Gulal) आणि खोबऱ्याची उधळण या देवाच्या रथावर करून आपला नवस फेडला जातो. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात.


हेही वाचा - Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती


वाशिम येथे पार पडला रथोत्सव 


वाशिम जिल्ह्यासह विदर्भ मराठवाड्याचे (Vidharbha Marthwada) ग्राम दैवत असलेल्या रिसोड तालुक्यातील लोणी गांवातील सखाराम महाराज यांच्या 144 व्या पुण्य तिथीनिमित्त आज रथोत्सव पार पडला. या रथोत्सवाची 144 वर्षांची परंपरा आहे.या यात्रेत परंपरेनुसार रथोत्सव दरवर्षी होत असून यावर्षी देखील ही परंपरा जपली गेली आहे. आदिवासी (Tribal) समाजातील मानकऱ्यांना मान देऊन आज रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला. रथोत्सवाचे संस्थान च्या वतीनं विधीवत पुजन करून रथोत्सवाची (Rathoutsav) सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो भावीक आपला नवस फेडण्यासाठी रथोत्सवात सहभागी झाले होते.