लातूर : लातूरच्या निलंगा तालुक्यातील निटूरच्या मधल्या एका खाजगी कंपनीच्या एटीएमवर काल रात्री अजब प्रकार घडला. मात्र, या अजब प्रकारामुळे नागरिकांचा चांगलाच फायदा झाला. पण तोही क्षणिकच होता. 


नागरिकांनी करून घेतला फायदा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथील एका खाजगी कंपनीच्या एटीएममध्ये १०० रुपयांची नोट काढायला बटन दाबल्यावर ५०० रुपयांची नोट बाहेर येत होती. विशेष म्हणजे एटीएमच्या स्लीपवर १०० रुपये खात्यातून कमी झाल्याची नोंद होत होती. हा प्रकार लक्षात आल्यावर अनेकांनी या एटीएमवर गर्दी करून पैसे काढले.  


पैसे वसूल करणार


सुमारे दोन ते तीन लाख रुपयांची रोकड काढून झाल्यावर एटीएम कंपनीचे अधिकारी आणि पोलीस दाखल झाले. दरम्यान, ज्या खात्यातून पैसे गेले त्याची नोंद त्या त्या बँकांमध्ये होत असते. त्यामुळे बँकांना असे पैसे वसूल करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे गावक-यांचा आनंद क्षणिकच ठरला तर आश्चर्य वाटू नये.