अहमदनगर : जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी येथे राज्यातील पहिल्या ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत  ग्रामरक्षकांची नियुक्ती करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राळेगणला नऊ ग्रामरक्षकांची निवड करण्यात आलीय. ग्रामरक्षक दलाच्या सदस्यातून अध्यक्ष आणि सचिवाची निवड होणार आहे. 15 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नवनियुक्त सदस्यांना राळेगणला ओळखपत्र दिलं जाणार आहे. 


ग्रामरक्षक दलानं गावातील व्यसनाधीनतेला आळा घालण्यास मदत होणार असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय. सदस्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनानं विलंब केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार. 


त्याचबरोबर तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास तीन वर्ष तडीपार करण्यात येणार आहे. हा ग्रामरक्षक दल सर्वांना आदर्श असून छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मुख्यमंत्र्यांनी मसुदा मागितल्याचे अण्णांनी सांगितले आहे.