Maharashtra Politics : वर्षभरानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष देखील फोडला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेतली आहे. राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. शिंदे फडणवीस सरकारचा हा शपथ विधी सोहळा म्हणजे भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मोठी खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निकालानंतर शिंदे फडणवीस सराकार कोसळू शकते. यामुळेच सरकार कोसळण्याआधीच अजित पवारांना हाताशी घेत  एकनाथ शिंदे यांच्या मदतीशिवाय सरकार कोसळण्याआधीच वाचवले आहे. 


सत्तासंघर्षावरून मविआत पेटला होता संघर्ष 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तासंघर्षावरून मविआत संघर्ष पेटला होता. नाना पटोलेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असता असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलाय. तर अजित पवार सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नसल्याचा निशाणा पटोलेंनी अजितदादांवर साधला होता. 


शिंदेंसोबत बंडखोरी करणा-या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी करणा-या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे.  सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. सत्तासंघर्षाचा निकाल स्पष्ट झालेला नाही.  16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरुन शिंदे फडणवीस सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कायदेशीर प्रक्रिया गुंतागुंतीची झाल्यास  16 आमदार अपात्र ठरल्यास शिंदे फडणवीस सराकर कोसळू शकते. शिंदेसह 40 आमदारांच्या पाठिंब्यावर राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले आहे.


16 आमदार अपात्र ठरल्यास पक्षीय बलाबलाचे गणित बिघडू शकते. अशा परिस्थितीत  एकनाथ शिंदे यांच्या मदतीशिवाय राज्यात सरकार स्थापन करता यावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी  अजित पवारांना हाताशी घेतले आहे. 40 पेक्षा जास्त आमदार अजित पवारांसोबत आहेत. अजित पवार गटाने शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाले. अथवा निवडणुका झाल्यास भाजप अजित पवार यांच्या पाठिंब्यावर देखील राज्यात सहज सत्तेत येवू शकते.