अहमदनगर : अहमदनगरमध्ये महापालिकेसाठी अंदाजे ५५ टक्के मतदान झालं आहे. एकूण ६८ जागांसाठी हे मतदान झालं. त्यापैकी झी २४ तासने जनमताचा अंदाज घेतला. त्यानुसार अहमदनगरमध्ये देखील त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. येथे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात चुरशीची लढाई होती. त्यामुळे कोण सत्ता मिळवणार याबाबत अनेकांना उत्सूकता आहे. सगळ्याच पक्षाने निवडणुकीत जोर लावला होता.


कोणाला किती जागा ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप २० ते २७ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर शिवसेना १५ ते २० जागा जिंकेल असा अंदाज आहे. काँग्रेस ४ ते ७ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी १६ ते १८ जागा जिंकेल असा अंदाज आहे. अपक्ष, छोटे पक्ष मिळून साधारणतः ५ ते १० जागा जिंकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे धुळ्यानंतर अहमदनगरमध्ये देखील त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.


झी 24 तासचे निवडणूक अंदाज  


अहमदनगर -  (बहुमताचा आकडा 35 )


एकूण जागा - 68   


भाजप      -   22 -27  
शिवसेना   -  15 - 20 
काँग्रस      -  4 - 7 
राष्ट्रवादी    -  16 - 18 
इतर         -  5 - 10   



अहमदनगर महानगरपालिकेसाठी मतदान उत्साहात पार पडलं.  संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अहमदनगरमध्ये साधारणतः ५३ टक्के मतदान झालं.  सकाळच्या सत्रात मतदान केंद्राबाहेर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. मात्र दुपारी मतदारांचा ओघ कमी झालेला पाहायला मिळाला. मात्र असं असलं तरी दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त होता.  जवळपास 2 हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते.