धुळे : धुळ्यात महापालिकेसाठी आज मतदान झालं. सुमारे ६० टक्के मतदान आज महापालिकेसाठी झालं. धुळ्यात महापालिकेची स्थिती कशी असेल याचा मतदानोत्तर अंदाज झी २४ तासने घेतला आहे. धुळ्यात एकूण ७४ जागांसाठी मतदान झालं. धुळ्यात त्रिशंकू स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


कोणाला किती जागा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळ्यात भाजपला २८ ते ३२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिवसेनेला ५ ते ८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला ८ ते ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादीला २० ते २४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. लोकसंग्राम पक्षाला ४ ते ६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर ८ ते १० जागा इतर आणि अपक्षांना मिळण्याचा अंदाज आहे.



७३ जागांसाठी ३५५ उमेदवार रिंगणात


मतदानाचा वेग अखेरच्या टप्प्यात वाढलेला पाहायला मिळाला. ७३ जागांसाठी ३५५ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिल्याने ही निवडणूक चुरशीची झाली होती. मतदान सुरू असताना वाडी भोकर इथे प्रभाग क्रमांक १ मध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मतदानाच्या दिवशी पैसे वाटप झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र आचारसंहिता कक्षात एकही तक्रार दाखल झालेली नाही. मतदानाचा वेग अखेरच्या टप्प्यात वाढला