मुंबई : मध्ये रेल्वेने गणपती विशेष गाड्यांचा विशेष शुल्कसह विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खालील गाड्यांचा विस्तार 


- 01261 ​​पनवेल - चिपळूण विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 20.9.2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 01262 चिपळूण - पनवेल विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 20.9.2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.


- 01257 लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड विशेष गाडी दिनांक  14.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 16.9.2021 पर्यंत (एक सेवा) वाढवण्यात आले आहे. 01258 सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 17.9.2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे.


- 01259 पनवेल - सावंतवाडी रोड विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 17.9.2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे.


- 01260 सावंतवाडी रोड - पनवेल विशेष गाडी दिनांक 14.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 16.9.2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे.


वरील विशेष गाड्यांचे थांबे आणि वेळेत कोणताही बदल नाही.


विशेष गाड्यांच्या विस्तारित सेवांसाठी विशेष शुल्कावर बुकिंग दिनांक 12.9.2021 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.


वरील विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळांसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा 


कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानका दरम्यान कोविड 19 शी संबंधित एसओपी, सर्व नियमांचे पालन करीत या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी असेल.