विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या महिनाभरापासून कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरु आहे. मात्र या प्रयोगाच्या माध्यमातून पडलेला पाऊस कुणी पाहिला का आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून मराठवाड्यात ९ ऑगस्टला कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची सुरुवात झाली. मात्र हा पाऊस पडलेला कुणी पाहिला आहे का असा प्रश्न मराठवाड्यातली जनता विचारत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्याती वेदर मॉडीफिकेशन या कंपनीला कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचं कंत्राट देण्यात आलं. या कंपनीच्या विमानानं गेल्या महिनाभरात १८ वेळा उड्डाणं केली. त्यात २३५ फ्लेअर्सच्या माध्यमातून ढगांमध्ये फवारणी सुद्धा करण्यात आली. मात्र आतापर्यंत ३० कोटी रुपये खर्च केलेल्या या प्रयोगाच्या माध्यमातून कुठे आणि किती पाऊस पडला याची नोंद या प्रयोगावर लक्ष ठेवणाऱ्या औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाकडे नाही आणि कंत्राट घेतलेली कंपनीही याची माहिती देत नाही. 


प्रशासनाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत औरंगाबाद, जालना, अहमदनगर, परभणी, बीड, बुलडाणा या जिल्ह्यांतल्या पाणीदार ढगांमध्ये फवारणी करण्यात आली होती. त्यातून पाऊस पडल्याची फक्त तोंडी माहिती सांगितली जात आहे. 


मराठवाड्यात आतापर्यंत पावसाच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत अवघा ५४ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे खरंच हा प्रयोग मराठवाड्याच्या फायद्यासाठी केला की अन्य कुणाकरता असा प्रश्न पडतो आहे.


<iframe width="560" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>