Explosive device found near river in Raigad : मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातील नदीजवळ काही संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. (Mumbai ATS team in Raigad) त्यात काही स्फोटक किंवा इतर कोणतेही ज्वलनशील पदार्थ असण्याची शक्यता आहे. दरम्यान, रायगड एसपीसह स्थानिक गुन्हे शाखा आणि मुंबई एटीएसचे पथकही (Mumbai ATS) घटनास्थळी पोहोचले आहे. पाण्याखाली सापडलेल्या संशयास्पद वस्तूंची चौकशी करण्यात येत आहे. (A suspicious object has been found near the river in Raigad district)


पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगडच्या पेणमध्ये मुंबई गोवा महार्गावरील नदी पात्रात सापडलेली स्फोटकं ही डमी असल्याची माहिती समोर आली आहेत. भोगावती नदीपात्रात बॉम्ब आढळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं. स्फोटक सदृश वस्तू निकामी केल्यानंतर ती डमी असल्याचं निष्पन्न झालं. डमी बॉम्ब असल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. आता मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असून, खोडसाळपणा कुणी केलाय का, याचा शोध पोलीस घेत आहे.


घातपाताचा कट? रायगडमध्ये जिवंत स्फोटकं सापडल्याने खळबळ


एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पद्धतीने स्फोटके एकमेकांशी जोडली गेली आहेत ते आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात नदीजवळ एक संशयास्पद वस्तू सापडली आहे. त्यात काही स्फोटक किंवा इतर कोणतेही ज्वलनशील पदार्थ असल्याचा संशय होता.  मात्र, चौकशीनंतर तसे काहीही नाही, हे स्पष्ट झालेय.