नाशकात स्फोटके सापडल्याने खळबळ
इंदिरानंगर येथे रस्त्याच्या कडेला स्फोटके आढल्याने परिसरात तणाव आहे. ६० जिलेटीन कांड्या आणि १७ डिटोनेटर्स सापडले आहेत. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नाशिक : इंदिरानंगर येथे रस्त्याच्या कडेला स्फोटके आढल्याने परिसरात तणाव आहे. ६० जिलेटीन कांड्या आणि १७ डिटोनेटर्स सापडले आहेत. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
इंदिरानगर परिसरात काल रात्री उशिरा ही स्फोटके आढळून आलीत. यात ६० जिलेटीन कांड्या, १७ डिटोनेटरचा समावेश आहे. इंदिरानगरच्या मोंढेनगर भागात, पाथर्डी शिवारात रस्त्याच्या कडेला स्फोटके सापडलीत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहते.
कोणत्या कारणासाठी कोणी स्फोटके आणलीत, याचा शोध सुरु आहे. विहीर खोदण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी कोणी परवानगी मागितली होती का याचा शोध सुरु आहे.