चंद्रशेखर भुयार, झी मीडिया,अंबरनाथ: नुकत्याच आलेल्या डोळ्यांच्या साथीनं (eye disease) महाराष्ट्रात थैमान घातलं होतं. डोळे लाल होणे, डोळे चुरचुरणे, डोळ्यातून पाणी येणे वैगेर लक्षणं लोकांमध्ये वेगानं पसरायला लागली होती. आता पुन्हा एकदा या साथीच्या रोगानं सगळीकडे थैमान घालायला सुरूवात केली आहे. (eyes disease in mumbai thane health department of municipality citizens to be aware)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात डोळ्याच्या साथ पसरली असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे. सध्या डोळे आल्याची तक्रार घेऊन दररोज 20 ते 25 रुग्ण डॉक्टरांकडे पोहोचत असून वाढत्या संसर्गामुळे नागरिकांची चिंताही वाढली आहे.


डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची (Primary symptoms of eye disease) प्राथमिक लक्षणं आहेत.डोळे लाल होऊन खुपू लागले की डोळे आले असे समजले जाते. डोळ्यांचा हा विकार संसर्गजन्य असला तरी हवेतून त्याचा प्रसार होत नाही. पण डोळे आलेल्या व्यक्तीने वापरलेला टॉवेल, रुमाल अथवा अन्य वस्तूंना स्पर्श केल्यास त्यापासून इतरांना लागण होऊ शकते. त्यामुळे अशा रुग्णाने वापरलेल्या वस्तू वेगळ्या ठेवाव्यात. डोळे आलेल्या व्यक्तीने नियमितपणे आपले हात सॅनिटायझरने निर्जंतूक करावेत. 


डोळे आलेल्या व्यक्तीने गडद रंगांच्या काचेचा गॉगल (Sunglasses) घालावा. त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. तसेच हवेतून धूळ आणि कचरा डोळ्यात जात नाही. डोळ्यांची साथ असली तरी ती सौम्य स्वरूपाची आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले.


जरी आपल्याला डोळे आल्याची प्राथमिक लक्षणे जाणू लागली तरी  डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. डॉक्टरांकडून डोळे तपासून घ्या आणि योग्य निदानानंतरच उपचार सुरू करा. कारण अनेकदा अन्य कारणांनीही डोळे लाल होतात तसेच या आजारातून साधारण आठवडाभरात रुग्ण बरा होतो असे अंबरनाथ येथील नेत्रतज्ञ डॉक्टर राहुल चौधरी यांनी सांगितल