मुंबई : आपण सिनेमात किंवा टीव्हीवरील डेलीसोपमध्ये हे पाहिलं असेल की, एखाद्या व्यक्तीची इच्छा अपूर्ण राहिली असेल किंवा त्याचा कोणी खून केला असेल तर, त्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा बाहेर भटकू लागतो आणि जेव्हा त्याचा हा अतृप्त आत्मा शांत होईल, तेव्हा तो माणसांच्या दुनियेतून निघून जातो. तर अनेकदा असं देखील सिनेमात दाखवलं जातं की, एक असा व्यक्ती असतो ज्याला मोठ्या तपश्चर्येमुळे वरदान मिळतं, ज्यामुळे त्याच्या शरीरातील आत्मा बाहेर पडतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमात हा सीन एडिटिंग किंवा ग्राफिक्स इफेक्टमुळे रंगवला जातो. हे आपल्याला माहित असतं, ज्यामुळे आपण त्याबद्दल जास्त विचार करत नाही.


परंतु खऱ्या आयुष्यात जर असा प्रकार घडला आहे असं, जर आम्ही सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? नाही ना? परंतु हे घडलंय


सोशल मीडियावर आपल्यासमोर असे काही व्हिडीओ समोर येतात. ज्यानवरती विश्वास ठेवणं थोडं कठीण होतं किंवा ते आपल्याला आश्चर्यचकित करतात.
 
सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलाच्या शरीरातून तिचा अत्मा बाहेर पडताना तुम्ही पाहू शकता. या विचित्र प्रकारामुळे हा व्हिडीओ सर्वत्र वाऱ्यासारखा पासरला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हिडीओचं सत्य काय?


हा व्हिडीओ पाहाताना तो तुम्हाला खराखूरा वाटत असला तरी, असं खरोखर घडलेलं नाहीय. एक प्रकारच्या एडिटींग इफेक्ट्समुळे हा सीन उभा केला गेला आहे. ही अंधश्रद्धा वाटत असली तरी हा सर्व ग्राफिक्सचा प्रकार आहे.


हा व्हिडीओ प्रथमदर्शनी पाहून कोणालाही आश्चर्य वाटू शकते. परंतु हा सगळा प्रकार ठरवून केला गेला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.