नाशिक : मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरुन भाजप सत्ताधारी शिवसेनेवर सातत्यानं टीका करत आहे. नाशकात मात्र भाजपची सत्ता आहे. तिथे आज पडलेल्या पावसामुळे शिवसेनेनं सत्ताधारी भाजपच्या विरोधात तुंबलेल्या पाण्यावरुन आंदोलन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पोहत विद्यार्थी सेनेने हे आंदोलन केले. महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालय बाहेर शिवसेना विद्यार्थी सेनेचे आंदोलन करत मनपा प्रशासना चा निषेध केला.


दरम्यान, पावासामुळे नदीला पूर आलाय. नाशकतल्या पावसाने गोदावरीच्या तिरावर असणाऱ्या अनेक बाजारपेठा पाण्याखाली गेल्या होत्या. आता पाणी ओसरु लागल्याने दिलासा मिळालाय. 


नाशिक शहर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. पाऊस कमी झाल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणी ओसरायला सुरवात झालीय. त्यामुळे पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा, घाण, पानवेली, गाळ, गोदाकाठावरच्या मंदिराभोवती जमा झालाय. तो हटविण्याचे काम युद्ध पातळीवर महापालिका प्रशासनाला करावे लागणार आहे. 


दरम्यान शुक्रवारच्या पावसाने गंगापूर, दारणा, आळंदीसह इतर धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ झालीय. दारणा धरणातून५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलंय तर नांदूर मध्यमेशवर धरणातून २२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.