सागर आव्हाड, झी मिडीया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणेः आयएएस अधिकारी (Pune Fake IAS Officer) असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथून एका इसमाला अटक केली आहे. औंध परिसरातील एका सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हा व्यक्ती हजर होता. त्यानंतर पोलिसांना (Pune Police) त्याच्यावर संशय आल्याने अधिक चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Fake IAS Officer Arrest) 


डॉ. विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे (वय 54 वर्ष रा प्लॉट नं.336, रानवारा रो हाऊस तळेगाव दाभाडे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तोतया आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. वासुदेव तायडे यांनी आपले खरे नाव लपवून डॉ. विनय देव असे नाव लावले होते. आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात गोपनीय काम करत असल्याचे तो लोकांना सांगत होता.


मध्यरात्री मॅच संपताच युवा व्यावसायिकाने गोळी झाडून स्वतःलाच संपवले, धक्कादायक कारण समोर 


प्रकरणी अधिक माहिती अशी की, २९ मे रोजी औंध परिसरातील सिंध हाऊसिंग सोसायटी येथे औंध पुणे बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मू काश्मीर येथे मदतीसाठी पाठवण्याकरीता ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून हजर असलेला डॉ. विनय देव हा व्यक्ती स्वतः आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात सेक्रेटरी पदावर गोपनीय काम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्याने सांगीतलेल्या माहितीवर संस्थेच्या पदाधिकारी यांनी अधिक विचारणा केली. मात्र, त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तो सांगत असलेल्या त्यांच्या आय.ए.एस पदाबाबत त्यांना संशय वाटला.


मुंडावळ्या बांधत असताना नवरदेव खाली कोसळला, हसते-खेळते कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त 


त्यानंतर, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती पुरवली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबत विनय देव याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसंच, त्याच्याबाबत अधिक माहितीही गोळा करण्यास सुरूवात तेली. तेव्हा हा व्यक्ती तोतया असल्याचे चौकशीत समोर आले. पोलिसांनी तळेगाव दाभाडे येथील घरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने आपले खरे नाव वासुदेव तायडे असल्याचे सांगितले. तसेच आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगून लोकांमध्ये वावरत असल्याची ही कबुली त्याने दिली. चतुशृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.