Duplicate Medicine News: बनावट औषधांच्या रॅकेटनं महाराष्ट्राला हादरवून टाकलेलं असतानाच आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आलीय. तपासणीसाठी पाठवलेल्या औषधांच्या अहवालाला प्रचंड कालावधी लागत असल्याचं समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबाजोगाईला औषध पुरवणाऱ्या एजन्सीपैकी एक विशाल एजन्सी होती. त्यांनी अंबाजोगाईप्रमाणे संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अँटी बायोटिकच्या 14 हजार गोळ्या पुरवल्या होत्या. या गोळ्या शासकीय रुग्णालयानं तपासणीसाठी सुद्धा पाठवल्या होत्या. त्याचा अहवाल आता आलाय. या गोळ्या बोगस असल्याचं निष्पन्न झालंय. मात्र याला लागले तब्बल 9 महिने. यादरम्यान ही सर्व औषध रुग्णांना देण्यात सुद्धा आली. कुण्या रुग्णावर याचा परिणाम झाला नाही हेच काय ते सुदैव.


तपासणीला इतका वेळ का लागतो. यावरचं अन्न आणि औषध प्रशासनाचं उत्तरही रंजक आहे. नवनियुक्त अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिलीय. माहिती घेऊन काय बदला करता येईल हे पाहणार, असं झिरवाळ यांनी म्हटलंय. 


मनुष्यबळ आणि तपासणीसाठी लॅब कमी आहेत. मात्र औषध तपासणीसाठी आल्यावर त्याची सत्यता तपासण्यासाठी 9 महिने लागत असतील आणि दरम्यानच्या काळात हे औषध दिल्यावर कोणाचा बळी गेला तर याला जबाबदार कोण याचे उत्तर कदाचित शासनाकडेही नाही. रुग्णांच्या जीवाशी खेळ होणार नाही, याची शासनानं आता गांभीर दखल घेण्याची गरज आहे.