कोल्हापूर :  Fake RTPCR Test : कोरोना काळात प्रवास करताना कोविडचे निर्बंध बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, कोविड नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. चक्क प्रवाशांना बसमधून प्रवास करण्यासाठी चक्क बनावट RTPCR रिपोर्ट देणाऱ्या  तीन ट्रॅव्हल्स कंपनीच्या 12 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. (Fake RTPCR report for travel, 12 employees of three travels companies arrested in Kolhapur)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बनावट रिपोर्ट घेवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक पोलिसांनी  अटक केली. त्यानंतर बनावट आरडीपीसीआर रिपोर्ट देणाऱ्यांची माहिती पुढे आहे. त्यानंतर प्रवाशांचे बनावट RTPCR रिपोर्ट बनविणाऱ्यांची पोलिसांनी माहिती मिळाली. पोलिसांनी कोल्हापुरातील तीन ट्रॅव्हल्स कंपनीच्या 12 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी कोल्हापुरात येवून ही धडक कारवाई केली आहे.


 कर्नाटक पोलिसांनी निपाणी ग्रामीण पोलीसांच्या मदतीने ही कारवाई केली. निपाणीचे सिपीआय प्रवाशी बनून आले. त्यानंतर स्टिंग ऑपरेशन करतबनावट RTPCR रिपोर्ट देणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीचा पर्दाफाश केला.


कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना ट्रॅव्हल्स कंपनी  बनावट रिपोर्ट बनवून देत असल्याचे उघड झाले आहे. सेफली ट्रॅव्हल्स, आनंद ट्रॅव्हल्स आणि साहारा ट्रॅव्हल्सवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या आठ दिवसापासून कोल्हापुरातील ट्रॅव्हल्स कंपनीवर कर्नाटक पोलिसांनी बारीक लक्ष ठेवून होते. त्यानंतर निपाणी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे.