योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : ढोंगी साधू महंतांचा शोध घेऊन शासनाने बंदोबस्त करण्याची मागणी, त्र्यंबकेश्वरच्या षटदर्शन आखाडा परिषदेने केली आहे. अशा महंतांची यादी दिल्लीत प्रसिध्द झाल्यानंतर आखाडा परिषदेचे आंतररार्ष्ट्रीय प्रवक्ता महंत मोहनदास रेल्वेतून प्रवास करताना अपहरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता देशभरात खरे साधू आणी खोटे साधू यांच्यात चांगलाच वाद उफाळून आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही बैठक आहे शैव पंथीय साधू महंतांची. यात राष्ट्रीय षटदर्शन आखाडा परिषदेचे महामंत्री प्रवक्ता आणि अध्यक्षही सहभागी झाले आहेत. देशात चौदा ढोंगी बाबांची लिस्ट जाहीर झालिये  हे फर्जी बाबा फक्त नावाने मोठे नाही तर राजकीय पाठींबा असलेले कोट्याधीश प्रस्थ असलेले बाबा आहेत. 


ही नावे जाहीर करून आखाडा परिषदेने त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. याच परिषदेचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ता हे मुबईला येत असताना ट्रेनमध्ये त्यांचे अपहरण करण्यात आले आहे ...गेल्या पंधरा तारखेपासुन ते गायब झाले असून महाराष्ट्रांची रेल्वे पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे. या फर्जी बाबांच्या गुंडाच्या  बळ इतके आहे कि पोलीस अजून शोधू शकलेले नाहीत..त्यामुळे व्यथित झलेले  आखाडा परिषदेच्या या बैठकीत खरे साधू महंत असुरक्षित होऊ लागल्याची खंत व्यक्त करण्यात आली. 


त्र्यंबक हे शिवाचे श्रद्धा स्थान आद्य्ज्योतीर्लिंग म्हणून तर नाशिक हि मन्दिराची नगरी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी देशभरातील साधू महंताचा  निवास असतो .आसाराम राम रहीम या प्रकरणाने  देशभरात होत असलेली धार्मिक बदनामीन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हेच लोण  पाटील बाबाच्या प्रकरणाने राज्यात आल्याने याबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.