मुंबई : तुमच्या कामाची आणि अत्यंत महत्त्वाची तुम्हाला सतर्क करणारी बातमी आहे. तुम्हाला जर वीजबिल भरण्यासाठी मेसेज आला असेल तर सावध व्हा. कारण, वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट मेसेज पाठवून संपर्क साधण्यात सांगून लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा प्रकारे वीजग्राहकांना लुटणारी टोळी राज्यात सक्रिय झाली आहे. बनावट मेसेज पाठवून ही टोळी ऑनलाईन गंडा घातला जात आहे. त्यामुळे तुम्हाला वीजबिल भरण्यासाठी आलेला मेसेज खरंच वीज कंपनीकडून आलाय का याची खात्री करा नाहीतर ही टोळी तुमचं अकाऊंट रिकामं करेल. 


वीजग्राहकांची कशी होतो फसवणूक?
- महावितरणकडून मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना सिस्टीमद्वारे मेसेज येतो
- वीजबिल भरलेलं नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असा मेसेज पाठवतात
- असे मेसेज वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठवण्यात येतात
- बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल नंबरवरून ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवतात
- ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगतात
- ग्राहकांनी प्रतिसाद दिल्यास मोबाईल हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास करतात 
- फसवणूक टाळण्यासाठी 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा


सध्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठवण्यात येणारे मेसेज हे बनावट आहेत...त्यास प्रतिसाद देऊ नये.बिलाच्या पेमेंटसाठी लिंक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये.तसेच मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये.


राज्यात अचूक मीटर रिडींग न घेणा-या 47 एजन्सीज बडतर्फ झाल्या आहेत. रिडींग घेताना हेतुपुरस्सर चुका आणि अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचं दिसून आलंय. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. 


याशिवाय 8 एजन्सीजना ब्लॅकलिस्ट करण्यात आलंय. मीटर रीडिंगचे फोटो अस्पष्ट असणे, फोटो व प्रत्यक्ष रीडिंगमध्ये तफावत असणे; तसेच रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे आदी प्रकार आढळून येत आहेत. त्याप्रमाणे संबंधित एजन्सीच्या कामामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.