Sangali Farmer Viral Video : सांगली जिल्हयातील (Sangali District) आटपाडीमध्ये शनिवारच्या आठवडा बाजारात एका तरुण शेतकऱ्याने आपल्या आलिशान मोटारीतून मेथीच्या भाजीची विक्री करत शेतकरी (Farmer) नावाच्या 'ब्रँड'ची झलक दाखवली. चक्क आलिशान गाडीतून एक तरुण शेतकरी ओरडून मेथीची भाजी विक्री करत असल्याचे पाहून बाजारकरूंनीही भाजी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. (Farmer Selling vegetables from a luxury car in the weekly market of Atpadi in Sangli district marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आटपाडी तालुक्यातील झरे गावचे शेतकरी वामन पांडुरंग गोरड यांनी आपल्या आलिशान गाडी मधून भाजी आणून ती विकली. शेती परवडत नाही, म्हणून अनेक शेतकरी आपल्या नशिबाला दोष देताना दिसतात. मात्र, आपण पिकवलेला माल आपण स्वतः विकला तर त्याला हमखास दर मिळतोच, हे दाखवून देण्यात आटपाडी तालुक्यातील झरे गावचे शेतकरी वामन पांडुरंग गोरड यांना यश आलंय. 


शेती करत असताना शेतकऱ्याला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. पीक घेत असताना असणारे हवामान, मजूर, लहरी निसर्ग याचबरोबर हवामान बदल, पिकावर रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. यातूनही पीक लिलावात दर न मिळाल्याने झरे येथील शेतकरी वामन गोरड यांनी शनिवारी आलिशान गाडीतून भाजी विक्री केली.


पाहा Video -



दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. पठ्ठ्याने आलिशान मोटारीतून भाजी विकल्याने सर्वत्र एकच चर्चा होताना दिसत आहे. शेतकरी म्हणजे गरिब असं एक समिकरण अनेकदा तयार झाल्याचं दिसतं. मात्र, आता शेतकऱ्याचा देखील ब्रँड तयार होतोय, हे या झरे गावच्या शेतकऱ्यामुळं सिद्ध होतंय.