अहमदनगर : Farmers' agitation at Puntamba : पुणतांबामधील शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पुणतांबाच्या ग्रामपंचायतीसमोर आंदोलन केलं जात आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे.  सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर 5 जूननंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.(farmers aggressive against Maharashtra government)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतीसंबंधी मागण्यांसाठी 23 मे रोजी पुणतांबा इथं विशेष ग्रामसभा घेऊन 14 मागण्यांचा ठराव करण्यात आला होता. हा ठराव सरकारला पाठवून आठ दिवस उलटले तरी कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने पुणतांबामधील शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झालेत. सुरुवातीला 5 जूनपर्यंत ग्रामस्थ धरणे आंदोलन करणार आहेत. या दरम्यान सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर 5 जूननंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे. 


शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या


- दुधाला एफआरपीप्रमाणे दर देण्यात यावेत


- गव्हाच्या निर्यातीवरची बंदी हटवावी


- ऊसाला एकरी दोन लाखांचे अनुदान द्याव


- सोलर विजेच्या शेतकरी अनुदान प्रक्रिया सोपी करावी