प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार: सध्या वातावरण बदलामुळं अनेक ठिकाणी सध्या दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली आहे. तर अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झालेलेही पाहायला मिळते आहे. तेव्हा अशावेळी अन्नधान्यांच्या पुरवठ्यावर आणि मागणीत बदल होत अन्नधान्यांच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. मध्यंतरी टॉमेटो, कांदा (onion rates) यांच्या दारातही विक्रमी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता ज्वारी ह्या धान्यालाही ही झळ सोसावी लागते आहे. सध्या ज्वारी (jawar) या धान्याचेही दर गगनाला भिडले आहेत. महागाईमुळे तुम्हा-आम्हाला भाज्यांचे - कडधान्यांचे विक्रमी दर मोजावे लागत आहेत. परंतु सध्या शेतकऱ्यांना ज्वारीचे चांगले दर मिळत आहेत. (Farmers have expressed their satisfaction as they are getting good rates)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांरी चांगलाच आनंदात आहे. चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नंदुरबार (nandurbar) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जाते. मात्र दरवर्षी राज्यभरात ज्वारीला हजार ते पंधराशे रुपये क्विंटल दर मिळत असतो, मात्र यावर्षी ज्वारीचे दर तेजीत असल्याचे चित्र नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून येत आहे. 


हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद


काय आहे दर? 


नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती चांगल्या प्रतीच्या ज्वारीला प्रतिक्विंटल 2966 रुपयांचा दर मिळत असून, हा आजपर्यंतचा सर्वाधिक दर असल्याचे व्यापारी आणि शेतकरी सांगतात बाजार समितीत दररोज पंधराशे ते दोन हजार क्विंटल ज्वारीची आवक होत असून ज्वारीला दर चांगला मिळत असल्याने शेजारील जिल्ह्यातील आणि गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमावरती भागातील शेतकरी ज्वारी विक्रीसाठी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 


हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


तापमानात बदल... 


हल्ली तापमानात वारंवार बदल (climate change) होत आहेत. त्यामुळे आपणही आजारी पडत आहोत. त्यातून अन्नांची नासाडी होत आहे. सततच्या बदलणाऱ्या या तापमानामुळे सगळीकडे सध्या हालाखीची परिस्थिती आहे.