कर्जमाफीसोबत शेतीसाठी शून्य किंवा अल्पदरात कर्जाची गरज - शरद पवार
दिल्लीत सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरु आहे, तेव्हा कृषि मंत्रालयाशी बोलून,
नागपूर : दिल्लीत सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरु आहे, तेव्हा कृषि मंत्रालयाशी बोलून, शेतकऱ्यांना मदत कशी मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत, अधिवेशन काळात सर्व जण भेटतात, त्यामुळे ही मदत मिळवून देणे सोयीचे होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
यानंतर केंद्राच्या कृषि विभागात जर मदत मिळणार नसेल, तर या खात्यात मी काम केलं आहे, शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय कुठून होतो, तो कसा महत्वाचा आहे, हे मला माहित आहे, त्या स्तरावर मी प्रयत्न करणार असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. शेतात नुकसान झालं आहे, अशा शेतकऱ्यांना पिककर्जमाफी द्या? अशी मागणी आम्ही करणार आहोत, कर्जमाफीतर द्यावीच पण, या वर्षाचं पिक गेलं, पण पुढील वर्षासाठी शून्य व्याजावर किंवा कमी व्याजावर शेती करण्यासाठी भांडवल म्हणून पिककर्ज मिळेल द्या, अशी मागणी देखील आपली असणार आहे, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.