सतीश मोहिते, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Nanded News Today: ऑगस्टमध्ये पावसाने (Rain) दडी मारली असली तरी सप्टेंबरमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला आहे. विदर्भ, मराठवड्यातील काही ठिकाणी मध्येच पावसाची एखादी सर येते. पावसाने जोर धरल्याने पुन्हा एकदा शेतीची कामे सुरू झाली आहे. मात्र, एका शेतकरी कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. शेतात गेलेल्या बाप-लेकाचा  तडफडून मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात ही मन सून्न करणारी घटना घडली आहे. (Father And Son Died Due To Electrocution)


नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोघेही बाप-लेक शेतीची कामे करण्यासाठी शेतात गेले होते. त्याचवेळी शेताभोवती असलेल्या तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह उतरला होता. मात्र, हा प्रकार दोघांनाही माहिती नव्हता. दोघेही नेहमीच्या सवयीने काम करत असतानाचा याच तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने शॉक लागून दोघांचाही तडफडून मृत्यू झाला. 


तालुक्यातील पिंपळकौठा येथील बालाजी मगरे व त्यांचा 15 वर्षी मुलगा दत्ता मगरे सोमवारी संध्याकाळी दोघेही नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. शेताच्या कडेला पिकाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या कुंपणात पावसामुळे विद्युत प्रवाह उतरला होता. याची दोघांनाही खबर नव्हती. दोघेही काम करत असताना दोघांचा तारांना स्पर्श झाला. 


तारांचा स्पर्श झाल्याने दोघांनाही विजेचा झटका लागला आणि ते तिथेच कोसळले. बाप-लेकाचा आवाज ऐकून बाजूच्या शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघा-बाप लेकांनी निपचीत पडलेले पाहून त्यांनी तातडीने त्यांना मुदखेड येथील रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. शेतात काम करत असताना बाप-लेकाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने मुदखेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.