कोल्हापूर : सासऱ्याने सुनेवर आणि दोन नातवांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


सून, नातवांवर हल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सासऱ्याने केलेल्या या चाकू हल्ल्यात ४ जण गंभीर पणे जखमी झाले आहे. अंघोळीसाठी घरात पाणी तापवण्याच्या कारणावरून सासऱ्याने हा हल्ला केल्याचं समोर येत आहे. सातपुते कुटुंबातील ४ जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहे.


४ जण गंभीर जखमी


पांडुरंग दशरथ सातपुते असं चाकू हल्ला केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. चाकू हल्ल्यात शुभांगी रमेश सातपुते, मयुरेश रमेश सातपुते, मनीषा रमेश सातपुते यांच्यासह हल्ला करणारा पांडुरंग दशरथ सातपुते देखील गंभीर जखमी झाले आहेत.


पोलिसांकडून चौकशी


कोल्हापूर जिल्ह्यातील मल्हारपेठ गावातील ही घटना आहे. जखमींवर प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कळे पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाची चौकशी करत आहेत.


पाहा व्हिडिओ