सैराट पेक्षा डेंजर स्टोरी ! प्रेम विवाह होण्याआधीच बापाने खेळ संपवला; लेकीसह असे कृत्य केले की...
नांदेडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्यानेच लेकीची हत्या केली आहे. मुलच्या प्रेम विवाह करण्याच्या हट्टाला पित्याचा विरोध होता.
Nanded Crime News : जन्मदात्या पित्यानेच लेकीची हत्या केल्याची खळबळजन घटना नांदेडमध्ये घडली आहे. मृत मुलगी अल्पवयीन आहे. तिचे एका तरुणासह प्रेम संबध होते. मात्र, पित्याला ते मान्य नव्हते. मुलगी प्रेम विवाहाचा हट्ट करत होती. यामुळे या अल्पवयीन मुलीची वडिलांनी कोयत्याने वार करुन हत्या केली. मात्र, आपला गुन्हा लवपवण्यासाठी या पित्याने जे केल ते पाहून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला.
काय घडलं नेमकं?
प्रेमविवाहाचा हट्ट करणाऱ्या स्वतःच्या मुलीवर कोयत्याने वार करून पित्याने तिची हत्या केली. त्यांनतर मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करून तिचा अंत्यविधीही करून टाकला. नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील ही घटना पोलिसानी शिताफीने उघडकीस आणली. मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनू तांडा येथे आठ दिवसापूर्वी ही घटना घडली होती.
हत्या करुन मुलीच्या मृतदेहावर अत्यसंस्कार केले
मनू तांडा येथील सोळा वर्षीय मुलीचे आपल्याच नात्यातील एका तरुणावर प्रेम होते. मृत मुलगी इयत्ता दहावीत शिकत होती. त्यांच्या प्रेमाला वडील अण्णाराव राठोड यांचा विरोध होता. पण मुलीने त्याच मुलाशी लग्नाचा अट्टाहास केला. तेंव्हा रागाच्या भरात अण्णाराव राठोड याने मुलीवर कोयत्याने वार केले. डोक्यावर गंभीर जखम झाल्याने तिचा मृत्यू झाला. 2 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. त्याच दिवशी मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करुन अंत्यसंस्कार उरकून टाकण्यात आला.
पोलिसांनी छडा लावला
पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. पोलिसांना याची कुणकुण लागल्यानंतर सखोल तपास करून खुनाचा उलगडा केला. मुक्रमाबाद पोलिसानी आरोपी अण्णाराव राठोड याला अटक केली आहे. यावेळी त्याने मुलीची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.
अकोला येथे तरुणाची हत्या
अकोला येथे तरुणाची हत्या झाली आहे. अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिंगणा फाट्याजवळ या तरुणाचा मृतदेह आढळून आला. शेख फारुख उर्फ शारुख असे मृत तरुणाचे नाव आहे. शेख याचे त्याच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत वाद झाला होता. यानंतर शाब्दिक बाचाबाची झाली आणि वाद विकोपाला गेला. यानंतर आरोपीने शारुखच्या डोक्यावर दगडाने वार केला रक्ताचा स्त्राव झाल्याने फारुखची घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.