नाशिक : सावत्र पित्यानं आपल्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याच्या सर्वांगावर मच्छरअगरबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील गोंदे गावात घडलाय. या चिमुकल्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


 मद्यधुंद अवस्थेत हेमंत राऊत यानं हा अघोरी प्रकार केला आहे. अभ्यासाचं कारण देत या चिमुकल्याला मच्छर अगरबत्तीचे चटके दिलेत. या प्रकरणी हेमंत रावत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.