दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : जगावर कोरोनाचं संकट दिवसागणिक अधिक गडद होत असताना दुसरीकडे याची औषध, इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या घटना देखील प्रकर्षाने समोर येतायतय. या पार्श्वभुमीवर एफडीएने महत्वाचं पाऊलं उचललंय. कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी FDA खबऱ्यांचं जाळं उभारत आहे. यासाठी एफडीएकडून १० लाख रुपयांची तरतूद देखील करण्यात आलीयं. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यासंदर्भात माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनावरील रेडीमसवीर, टोसीलिझुमाब या इंजेक्शन्सचा काळाबाजार करणार्‍यांविरोधात FDA आणि गृहविभाग संयुक्तपणे कारवाई करणार आहेत. आतापर्यंत मुंबई आणि परिसरात तीन ठिकाणी अशा प्रकारची कारवाई करण्यात आलीयं. 


ठाणे, मुलुंड, मीरा रोडमध्ये इंजेक्शनचा काळाबाजार निदर्शनास आला होता. याप्रकरणी मीरा रोडला झालेल्या कारवाईत २ जणांना अटक तर या कारवाईत २ रेडीमसवीर इन्जेक्शन जप्त करण्यात आली. ५४०० रुपयांचे हे एक इंजेक्शन आहे. मुलुंड येथील कारवाईत रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले असून ७ जणांना अटक करण्यात आलीय. इथे १३ रेडीमसवीर जप्त करण्यात आले असून एक इंजेक्शन ३० हजार रुपयाला विकत होते.



टोसीलिझुमाब भारतात बनत नाही ते बाहेरून येते त्यामुळे त्याचा पुरवठा कमी आहे. आता थोडा पुरवठा वाढला असून रेडीमसवीरचा पुरवठाही आता वाढलाय. असे असले तरीही याचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी येत असून त्याविरोधात एफडीएची कारवाई सुरू आहे.