VIDEO: साडी नेसून महिलेनं चालवली बस, नेटकरी म्हणाले, `ताई सीट बेल्ट लावा`
Female Bus Driver in Saree: सध्या एक इंटरेस्टिंग व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हालाही फार आनंद होईल. सध्या एका महिला या साडी नेसून बस चालवताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिलात का?
Female Bus Driver in Saree: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा असते. आता महिलाही प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. गाडी चालवण्यातही त्या एकदी पुढे आहेत सध्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात चक्क त्या महिलेनं साडी घालत बस चालवली आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा आहे. सध्या या महिलेचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा ही रंगलेली आहे. अनेक जणं तिच्या या व्हिडीओखाली सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
महिला आज पुरूषांच्या तोडीस तोड काम करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. आज प्रत्येक क्षेत्रात त्या चांगलं काम करत असून पुरूषांच्याही वर कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल चहूबाजूंनी कौतुक होताना दिसते. आपल्याला माहितीच आहे की महिला आता ड्रायव्हिंग क्षेत्रातही सक्रिय आहेत. आज बस काय, विमान काय त्या रेल्वेही चालवतात. शेतात ट्रॅक्टरही चालवतात. त्याचसोबत स्कुटीही चालवतात. महाराष्ट्रातही अशा अनेक महिला आहेत ज्या यात तरबेज आहेत.
आम्ही ज्या महिलेबद्दल बोलत आहोत त्यांचे नावं आहे मीना भगवान लांडगे. या एक महिला बस ड्रायव्हर. त्या यात अगदी माहिर आहेत. यावेळी बस चालवताना त्यांनी साडी परिधान केली होती. यावेळी साडी नेसताना ड्राईव्ह करणं हे त्यांना थोडं कठीण जात होतं असे व्हिडीओतून दिसून येते आहे. परंतु त्यातही त्या फारच आनंदी दिसत आहेत आणि चेहऱ्यावर हास्य ठेवत त्या ही बस चालवत आहेत. यावेळी आपली संस्कृती जपत त्यांनी बस चालवल्यानं सर्वत्र त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.
सध्या या व्हिडीओवर नाना तऱ्हेच्या कमेंट्सही येताना दिसत आहेत. 'एक नंबर ताई, आई जगदंबा तुमच्यासोबत आहे', अशी एकानं कमेंट केली आहे. 'तुमच्या हिंमतीला सलाम. हॅट्स ऑफ टू यू' अशी एकानं कमेंट केली आहे. 'ताई खूपच सुंदर परंतु तुमच्या सुरक्षेसाठी एका सीटबेल्टचीही गरज आहे'. तर एकानं अशीच एक इंटरेस्टिंग कमेंट केली आहे. त्यात तो म्हणतो की, 'भारतीय नारी सबसे भारी'. सध्या या व्हिडीओखाली येणाऱ्या या कमेंट्स पाहून आपल्या लक्षात येईल की या व्हिडीओला चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी खूपच चांगल्या कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होतो आहे.