गारगोटी ग्रामपंचायत कार्यालयात तुंबळ हाणामारी
किरकोळ कारणावरुन राडा
कोल्हापूर : गारगोटी ग्रामपंचायत कार्यालयात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. किरकोळ कारणावरुन हा राडा झाला. या मारहाणीची दृश्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. पराभव सहन न झाल्याने विरोधकांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.
मारहाण आणि तोडफोड केल्याप्रकरणी गारगोटी पोलीस ठाण्यात अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीची संपूर्ण तालुकाभर जोरदार चर्चा सुरु आहे.