कल्याण : राजकीय नेत्यांचे कशावरून भांडणं होतील याचा काही नेम नाही. राजकीय लोक नेहमीच वर्चस्वासाठी ऎकमेकांसोबत भिडल्याचेही बघायला मिळाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणमध्ये नुकतंच एक शुल्लक कारणावरून एका पक्षातील महिला नगरसेविकांमध्ये झालेली मारामारी समोर आली आहे. बॅनर लावण्याच्या क्षुल्लक कारणावरुन शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये राडा झाल्याची घटना रविवारी रात्री कल्याणमध्ये घडली.



 कल्याण ईस्टमध्ये शीतल मंढारी आणि माधुरी काळे या प्रभाग ९८ आणि ९९ च्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्यात काळे यांनी मंढारी यांच्या प्रभागात मागच्या टर्ममध्ये झालेल्या कामाचा बॅनर एका सोसायटीने लावल्याने या दोघींमध्ये वाद झाला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


कोळसेवाडी पोलिसांनी रात्री उशिरा माधुरी काळे यांच्याविरोधात अॅट्रोसिटी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मंढारी आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून दोन्ही नगरसेविकांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.