नंदूरबार पालिकेत नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी
नगरसेवकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपने ही मारहाणीची घटना पूर्व नियोजीत होती का? याचा तपास करून आरोपींना तात्काळ अटक करढ्याची मागणी केली आहे. तर काँग्रेसकडून भाजपवर आरोप करण्यात आलाय
नंदूरबार : पालिकेत नगरसेवकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपने ही मारहाणीची घटना पूर्व नियोजीत होती का? याचा तपास करून आरोपींना तात्काळ अटक करढ्याची मागणी केली आहे. तर काँग्रेसकडून भाजपवर विकास विरोधी राजकारणाचा आरोप करण्यात आला आहे.
भाजपवर काँग्रेसचा आरोप
काँग्रेस पक्षाला जनतेने दिलेला कौल भाजपला पचत नसून पूर्व नियोजित मारहाण करत भाजपने गुंडगिरीचे राजकारण सुरू केल्याचा आरोप नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केला आहे. तर भाजपच्या प्रवक्त्या कांता नलावडे यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत भाजप नगरसेवकांची विकास काम होत नसल्याचा आरोप केला आहे.
पालिकेतील हाणामारी प्रकरणी नंदूरबार शहर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.