कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींविरोधात कोल्हापुरातही तक्रारी समोर आल्यात. इथल्या जवळपास सहाशे ठेवीदारांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्यात. कोल्हापूरकरांच्या सुमारे दोनशे कोटींच्या ठेवी अडकल्यात. 


ठेवीदारांचा रविवारी मेळावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संदर्भात ठेवीदारांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलीय. या सगळ्या ठेवीदारांचा रविवारी मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यात कारवाईबाबत पुढील रणनिती ठरवली जाणार आहे. दरम्यान ठेवीदारांची कागदपत्रे पाहून एकत्रित गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळतेय. 


मुंबईतही तक्रार दाखल


मुंबईतही डी एस कुलकर्णी यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाली आहे, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला ही तक्रार दाखल झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. पुणे, कोल्हापूर नंतर आता मुंबईतही डीएसके यांच्या विरोधात याचिका दाखल झाली आहे.