Pankaja Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde )यांना जबरदस्त झटका देणारी घडामोड बीडमध्ये घडली आहे.  पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैजनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला (Vaijnath Urban Co Operative Bank) आर्थिक गुन्हे शाखेने (Financial Offenses Branch notice )नोटीस बजावली आहे. आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. या कारवाईमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैद्यनाथ बँकेकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हावरगाव शंभू महादेव शुगर अलाइड इ.प्रा.लि. कारखाना तारण होता. त्यावर वैद्यनाथ बँकेसह इतर बँकांचा बोजा होता. शंभू महादेव कारखान्याने मुदतीत कर्ज रक्कम परत न केल्याने कारखाना लिलावात काढण्यात आला, मात्र लिलाव प्रक्रियेत अटी शर्थीचे उल्लंघन केले. अशी तक्रार पोलिसात करण्यात आली होती.
शंभू महादेव कारखान्याच्या लिलावात अटी, शर्थीचे उल्लंघन केल्याचा बँकेवर आरोप असून पोलिसांच्या नोटीसमुळे खळबळ उडाली आहे. दी. वैद्यनाथ अर्बन को- ऑप बँकेचे सभासद सुभाष कारभारी निर्मळ यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात 5


जानेवारी चौकशी करून गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.


पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज


पंकजा मुंडे या पक्षात नाराज असून त्या भाजपमधून (BJP) बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगलेय. ठाकरे गटाच्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत (Shivsena) येण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे  पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. त्यातच भाजप नेत्यांच्या कार्यक्रमाला त्या गैरहजर राहत आहेत. तसेच बॅनरवरुन त्यांचे फोटो देखील गायब होत आहेत. 
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना परभवाचा धक्का बसला. पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना देखील याचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे आमदार तथा बंधू धनंजय मुंडे(dhananjay munde) यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास खडतर बनला आहे. तेव्हापासून आतापर्यंत पंकजा मुंडे या पुन्हा भरारी घेण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, राज्यात पुनर्वसन झालेलं नाही. पक्षाकडून अद्याप त्यांच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. यामुळे त्या नाराज आहेत.