नवी दिल्ली :  Vinayak Raut on Nilesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात आवारात स्वाभिमान पक्षाच्या लोकांकडून धुडगूस घातला गेला ते योग्य नाही. न्यायालयाचं पावित्र्य राखले पाहीजे. त्यावर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यानुसार पोलिसांना शरण जायला पाहीजे, असेही राऊत म्हणाले. दरम्यान, न्यायालयाच्या आवारात हुज्जत घातल्या प्रकरणी नीलेश राणे यांच्यासह भाजपच्या अन्य पाच जणांवर ओरोस पोलीस स्थानकात रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काल भाजप आमदार नितेश राणे यांच्या सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. जमाव केल्याप्रकरणी आणि पोलिसांशी हुज्जत, शांततेचा भंग केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत. व्हिडीओ शूटिंग पाहून अन्य जणांवर ही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त जमाव केल्याप्रकरणी आणि जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


दरम्यान, विनायक राऊत म्हणाले, महाविकास आघाडी वाईन संदर्भात योग्य तो निर्णय घेईल. खासदार जलील यांना कांगावा करणं माहिती आहे. वाईनच्या माध्यमातून नवे मार्केट उपलब्ध होत असेल तर तो निर्णय योग्य होता. मुंबई महापालिकेची पुर्नरचना संदर्भात आक्षेप घ्यायचा असेल तर घ्यावा. कामकाज आटोपून घेणे हे सरकारचं धोरण आहे. पेगासेसवर चर्चा व्हायला हवी, असे ते म्हणाले.


 तसेच उत्तर प्रदेशाने पंतप्रधान दिले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी युपीच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली. मोदी म्हणतात कित्येक करोडपती झाले पण अनेकजण रोडपती झाले आहेत, अशी टीका यावेळी त्यांनी केली.