वर्धा : आष्टी तालुक्यातील पार्डी येथे जनावरांच्या गोठ्याला आग लागली. या आगीत ५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. तर १० जनावरे भाजल्याने गंभीर जखमी झालीत. पार्डी गावठाण येथे जनावरांचा गोठा होता. काही शेतकरी आपली जनावरे याठिकाणी बांधून ठेवायचे. याच परिसरात कडबा कुटार आणि वैरणाच्या गंजी देखील होत्या. आज दुपारनंतर अचानक याठिकाणी आग लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैरणाच्या गंजीसह जनावरांचा गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी आला. या आगीत गोठ्यातील ५ जनावरं होरपळून जागीच ठार झाली तर आगीत भाजल्याने १० जनावरं जखमी झाली. आग लागल्याचे दिसताच ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. शिवाय आर्वी आणि आष्टी येथील अग्निशामक दल  आणि तळेगाव पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. या आगीत पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असून आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही.