अतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरात भीषण आग लागली आहे. मेट्रोपॉलिटीन कंपनीत आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कंपनीत आगीच्या ज्वाळांचे लोट पसरले आहेत. आगीत आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. ही आग इतकी मोठी आहे की, एमआयडीसी फेज २ मधील सर्व कारखाने बंद करण्यात आले आहेत. कामगारांना घरी सोडण्यात आलं आहे. तसंच या परिसरातला म्हात्रे पाडा रिकामा करण्यात आला आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवली एमआयडीसीतील मेट्रोपोलिटन केमिकल कंपनी भीषण आगीत जळून खाक झाली. ही आग इतकी भीषण आहे, की ही कंपनी असणारा एक किलोमीटरचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. या कंपनीत असणारे केमिकल ड्रमचे आगीमुळे लागोपाठ स्फोट होत असून या कंपनीशेजारी असणाऱ्या कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. सर्व कंपन्यातील कामगारांना बाहेर काढण्यात आलं आहे.


तर, आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या शाळाही सोडण्यात आल्या असून रहिवाशांनाही सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. या आगीमुळे संपूर्ण डोंबिवली परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आहेत. केमिकलच्या वासाने लोकांना त्रास होत आहे. या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याण डोंबिवलीसह, भिवंडी, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर आदी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले आहे.