ठाणे : मॉल ,हॉटेल्स ,पब ,अशा गर्दीच्या ठिकाणी जिथे ३१ डिसेंबर ची धूम सुरु असणार आहे अश्या ठिकाणच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी अग्निशमक दलाला ऑल ईज वेलचा मेसेज दर एक तासांनी देण्याच फर्मान ठाण्यातील अग्निशामक दलाने काढल आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमला मिल इथे घडलेल्या आगीच्या दुर्घटने नंतर आता सर्वच यंत्राणा कामाला  लागल्या आहेत. तर आगीच्या घटनांवर तत्काळ नियंत्रण आणण्याकरिता ठाण्यातील ओवळा, टिकुजिनीवाडी, लोकमान्यनगर बस डेपो, रेमण्ड, कळव्यातील मनीषानगर आणि दिवा येथे 24 तासांच्या कालावधीकरिता तात्पुरती अग्निशमन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.


येथे एक फायर इंजीन आणि सहा ते सात कर्मचारी तैनात असतील. तर यासाठी अग्निशमक दलातील सर्व सुट्ट्या रद्ध करण्यात आल्या आहेत. सतत १६ तास प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी आपली ड्युटी निभावणार आहेत.


पाहा व्हिडिओ