वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वसई हद्दीत आगीचे तांडव सुरूच आहे. तुंगारेश्वर फाटा गणेश नगर सातिवली इथं रात्री ११ वाजता एका कागदाच्या गोडावूनला भीषण आग लागली. आगीत गोडावूनमधील लाखो रुपयांचा कागदाचा कच्चा माल जळून खाक झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना सहा तास शर्थीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलंय. सध्या ही आग कुलिंग करण्याचे काम सुरू आहे. 


दरम्यान, ही आग कशाने लागली? याचं कारण समजू शकलेलं नाहीत. शॉर्ट सर्किट किंवा फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येतोय. 


गेल्या दोन दिवसांपासून वसई आगीने धुमसत आहे. बुधवारी महामार्गाजवळ रिचर्ड कंपाऊंडमध्ये फटाक्याने आग लागून दोन कंपन्या जळून खाक झाल्या होत्या. तर काल रात्री पुन्हा वसईतील तुंगारेश्वर इथं ६० गोडावून जाळून खाक झाले आणि आज पुन्हा तुंगारेश्वर परिसरातच कागदाचे गोडावून जळाले असल्याने हे आगीचे तांडव कधी थांबणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.