सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या डेपोत अचानक आग लागून सात बस जळून खाक झाल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अग्निशामक बंब लवकर आल्यानं मोठा अनर्थ टाळला. अन्यथा बस डेपोत ५५ बसेस उभ्या होत्या. अग्निशामक दल वेळेवर पोहचल्यानं उभ्या असलेल्या अनेक बसेस आगीपासून वाचल्या.


या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तरी डबघाईला आलेल्या परिवहन उपक्रमाला मोठा फटका बसलाय. आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही.