सांगली : ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलंय. कामेरी इथलं राजारामबापू साखर कारखान्याचे गट कार्यालय आणि कसबे डिग्रजमधलं वसंतदादा साखर कारखान्याचे विभागीय कार्यालय अज्ञातांनी पेटवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एफआरपी अधिक दोनशे रुपये जोपर्यंत दिले जात नाहीत, तोपर्यंत साखर कारखान्यांना ऊस दिला जाणार नाही, अशी भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी घेतलीय. 


याबाबत साखर कारखान्यांना दहा तारखेपर्यंत अल्टीमेटम देण्यात आलेला आहे. अकरा तारखेला चक्का जाम आणि गाव बंद आंदोलन करण्यात येणार आहे. 


अधिक वाचा :-  ...तर आम्ही कायदा हातात घेऊ- राजू शेट्टी


मात्र, अनेक साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर न करताच साखर कारखाने सुरु केले आहेत, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. 


त्यातूनच ठिकठिकाणी जाळपोळ आणि टायर फोडण्याच्या घटना घडत आहेत.


उसाच्या उत्पादनात घट


दरम्यान, उसाचं उत्पादन घटल्यामुळे साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे. २०१८-१९ च्या हंगामात साखर उत्पादनाचा आकडा जाहीर होणाऱ्या अंदाजानुसार घटतच आहे. उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने काही प्रमाणात साखरेचे दर वाढतील असा अंदाज रेटींग एजन्सीने व्यक्त केलाय. 


देशात अनेक राज्यात दुष्काळाची स्थिती असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षीच्या गाळप हंगामात ३२३ लाख टन साखर उत्पादन झालं होतं. इस्मा या संस्थेने राज्यात ११० ते ११५ लाख टनांवर उत्पादन ९५ लाख टन होईल असं म्हटलंय.