...तर आम्ही कायदा हातात घेऊ- राजू शेट्टी

आताच्या सरकारला रक्तपात पाहिजेय असा आरोपही त्यांनी केलायं.

Updated: Nov 8, 2018, 09:30 PM IST
...तर आम्ही कायदा हातात घेऊ- राजू शेट्टी

रवींद्र कांबळे, झी मीडिया, कोल्हापूर :  'ऊस दराचा एफ आर पी न दिलेल्या साखर कारखान्यांना गाळप परवाने देऊ नका, असे न्यायालयाने आदेश दिले आहेत, मात्र तरी अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या कारखान्यांना पोलीस संरक्षण दिले जात आहे,' असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. हिंसा निर्माण करण्याच्या प्रवृत्तीची मानस सरकार मध्ये बसली आहेत आणि आताच्या सरकारला रक्तपात पाहिजेय असा आरोपही त्यांनी केलायं.

'तर कायदा हातात घेऊ'

'वेळ प्रसंगी आम्ही कायदा हातात घेऊ मात्र आमचा अधिकारी मिळवून घेऊ', असा निर्धार खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. तसेच 'सदाभाऊ हा किरकोळ माणूस, तो आमचा स्पर्धक होऊ शकत नाही', असे वक्तव्य ही खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.ो

'येत्या 11 तारखे नंतर एक दिवसाचा बंद पुकारला जाईल, आणि चक्का जाम आंदोलन केले जाईल', असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.